पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सून माघारी फिरून 24 तास उलटले नाहीत, तोच विदर्भाचा पारा 36 ते 37 अंशांवर पोहोचला आहे. मंगळवारी अकोला शहरात 37.2 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे उकाडा जाणवत होता. राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा जोरदार तडाखा जाणवू लागला असून, घरांतील पंखे 24 तास सुरू झाले आहेत.
मंगळवारी राज्यातील बहुतांश भागाचे कमाल तापमान 34 ते 37 अंशांवर गेले होते. प्रामुख्याने विदर्भातील सर्वच शहरे तापण्यास सुरुवात झाली असून, तेथे सरासरी तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसवर गेले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही तापमान 34 ते 35 अंशावर गेले आहे. कोकणासह मुंबईत पारा 32 ते 33 अंशावर आहे.
अकोला 37.2, अमरावती 35.6, ब्रम्हपुरी 36, नागपूर 35, यवतमाळ 36, परभणी 35.8, छत्रपती संभाजीनगर 34.4, मुंबई 32.6, अलिबाग 33, डहाणू 33, पुणे 34.6, जळगाव 35, कोल्हापूर 32.6, सांगली 36, सोलापूर 36.
हेही वाचा