Shekhar Singh : मी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार : शेखर सिंह | पुढारी

Shekhar Singh : मी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार : शेखर सिंह

पिंपरी : माझा महापालिका आयुक्त पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ आहे. तो कालावधी मी पूर्ण करणार, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.10) व्यक्त केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे झाले आहेत. आयुक्त सिंह हे पवार यांच्या पसंतीचे अधिकारी नाहीत. तसेच, त्यांची उपस्थित केलेली माहिती आयुक्तांनी वेळेत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे पालकमंत्री पवार हे नाराज आहेत. परिणामी, आयुक्तांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, राज्य शासना माझी तीन वर्षांसाठी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर व राजेश पाटील यांच्या कार्यकाळ सुरू झालेली कामे पूर्ण करायची आहेत. मी पूर्ण तीन वर्षे आयुक्त म्हणून कामकाज सांभाळेल, असा मला विश्वास आहे. शासनाचा बदलीचा आदेश आल्यास काही सांगता येत नाही. मात्र, मला तशी शक्यता वाटत नाही. यापूर्वीही मी बदली मागत असल्याची अफवा होती.

हेही वाचा

नाशिक ड्रग्ज प्रकरणात छोटा राजन टोळीचा संबंध

आर्थिक, मानसिक स्थिती बिघडलेली; सुप्रीम कोर्टाने दिली विवाहितेला गर्भपातास परवानगी

IND Vs AFG ODI WC : अफगाणिस्तानने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

Back to top button