दौंडमध्ये महिला डॉक्टरने सहकारी पुरुष डॉक्टरवर भिरकावली चप्पल

दौंडमध्ये महिला डॉक्टरने सहकारी पुरुष डॉक्टरवर भिरकावली चप्पल
Published on
Updated on

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरालगत असलेल्या लिंगाळी हद्दीत असणार्‍या श्री साई हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टर अश्विनी वाळुंज यांनी डॉक्टर तात्या भगवान निंबाळकर यांच्या केबीनमध्ये घुसून क्षुल्लक कारणावरून त्यांवर चप्पल भिरकावली. ही घटना मागील बुधवारी (दि. 4) सकाळी 9.30 ते 10.20 वाजेच्या सुमारास घडली. मात्र, याप्रकरणी सोमवारी (दि. 9) तक्रार दाखल करण्यात आली.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अश्विनी वाळुंज या डॉ. तात्या निंबाळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सन 2017 ते 2022 दरम्यान कामावर होत्या. त्यानंतर त्यांनी तेथील काम सोडले. दरम्यान, बुधवारी त्या काही कामानिमित्त रुग्णालयात आल्या.

या वेळी त्यांचा हॉस्पिटलमधील महिला कर्मचार्‍यांशी शाब्दिक वाद झाला. यानंतर त्यांनी आपला मोर्चा डॉ. तात्या निंबाळकर यांच्या केबिनकडे वळवला. त्या वेळी डॉ. तात्या निंबाळकर हे रुग्ण तपासणी करीत होते. डॉ. अश्विनी यांनी अचानक पायातील चप्पल काढून डॉ. निंबाळकर यांच्या दिशेने भिरकवली. ती त्यांच्या डोळ्यांच्या खालील भागात लागली. त्यानंतर डॉ. अश्विनी यांनी टेबलवर असलेल्या पेपरवेट उचलून डॉक्टरच्या दिशेने भिरकावला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. यादरम्यान डॉ. निंबाळकर यांचे सहकारी डॉ. अभिषेक वाळुंज हे त्यांना समजाविण्यास गेले असता, त्यांनादेखील डॉ. अश्विनी यांनी हाताने मारहाण केली. तसेच 'तुम्हाला व तुमच्या सहकार्‍यांना मी कोणत्याही खोट्या गुन्हा अडकविन,' अशी धमकी देत डॉ. अश्विनी तेथून निघून गेल्या.

दरम्यान, या मारहाणप्रकरणी डॉ. तात्या निंबाळकर यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर, डॉ. अश्विनी यांनी केवळ मौखीक स्वरूपात तक्रार दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार किरण डोके करीत आहेत.

डॉक्टरांचे चालले तरी काय?
दौंड शहरातील डॉक्टरमध्ये मागील दोन महिन्यांपासून भांडणे सुरू आहेत. यामध्ये शहरातील दंतचिकित्सक डॉक्टरांचे प्रकरण फार तापले होते. त्यामुळे दौंड शहरात डॉक्टरांचे चालले तरी काय? असा प्रश्न पडत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news