मुंबई : नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांत होणार्या मृत्यूंवरून महायुती सरकारच्या काळात राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, नांदेड, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचार्यांची रिक्त पदे, अशा अनेक बाजू उघडकीस आल्या आहेत.