शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्या आल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. एक बिबट्या रस्त्यावरून फिरतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अफवा पसरविणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शेळगाव हद्दीतील तेलओढा परिसरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एका वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. ते ठसे बिबट्याचेच असल्याची शक्यता काहींनी वर्तविल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संबंधित बातम्या :
परंतु, वन विभागाच्या अधिकार्यांनी त्या ठशांची पाहणी केली. या वेळी ते ठसे बिबट्याचे नसून तरसाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, आता शेळगावसह गोतोंडी, हगारेवाडी, शिरसटवाडी, पिटकेश्वर, सराफावाडी व लगतच्या वाड्या-वस्त्यांवर व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून अनेक जण बिबट्या फिरत असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. मागील चार-पाच दिवसांच्या कालावधीमध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर बिबट्याची अफवा पसरवू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, अफवांचा प्रकार थांबनेसा झाला आहे. त्यामुळे वालचंदनगर पोलिस प्रशासनाने अफवा पसरविणार्यांचा शोध घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्या आल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. एक बिबट्या रस्त्यावरून फिरतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अफवा पसरविणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेळगाव हद्दीतील तेलओढा परिसरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एका वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. ते ठसे बिबट्याचेच असल्याची शक्यता काहींनी वर्तविल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वन विभागाच्या अधिकार्यांनी त्या ठशांची पाहणी केली. या वेळी ते ठसे बिबट्याचे नसून तरसाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मात्र, आता शेळगावसह गोतोंडी, हगारेवाडी, शिरसटवाडी, पिटकेश्वर, सराफावाडी व लगतच्या वाड्या-वस्त्यांवर व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून अनेक जण बिबट्या फिरत असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. मागील चार-पाच दिवसांच्या कालावधीमध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर बिबट्याची अफवा पसरवू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, अफवांचा प्रकार थांबनेसा झाला आहे. त्यामुळे वालचंदनगर पोलिस प्रशासनाने अफवा पसरविणार्यांचा शोध घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डाळिंब चोरीच्या उद्देशाने अफवा
सध्या इंदापूरच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबबागा तोडणीला आल्या आहेत. त्यातच डाळिंबालाही जादा बाजारभाव आहे. त्यामुळे डाळिंब चोरीच्या उद्देशानेदेखील बिबट्या आल्याची अफवा पसरवली जात असल्याची चर्चा या भागात नागरिकांमध्ये सुरू आहे.