Pune News : साडेचार हजार श्वानांसह मांजरांचे लसीकरण

Pune News : साडेचार हजार श्वानांसह मांजरांचे लसीकरण
पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक रेबीज दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत  4 हजार 255 पाळीव श्वान व मांजरांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली. याबाबत माहिती देताना डॉ. गर्जे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी जागृती आहे.
प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा 'रेबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. याचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. या आजारावर कोणताही ठोस उपचार नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत.

रेबीजविषयी जाणून घ्या

रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये व काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो. रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. रेबीजवर प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news