Pune News : पुण्यातून फरार झालेला इसिसच्या दहशतवाद्याला बेड्या ; दिल्ली स्पेशल पोलीस सेलची कारवाई

Pune News : पुण्यातून फरार झालेला इसिसच्या दहशतवाद्याला बेड्या ; दिल्ली स्पेशल पोलीस सेलची कारवाई

पुणे : कोथरूड येथील दुचाकी चोरताना पकडलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक इसिसचा बंदी असलेल्या अलसुफा संघटनेचा दहशतवादी कोंढाव्यातून फरार झाला होता. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर एन आय ए ने तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या अटकेमुळे आता तपासला योग्य दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहानवाज उर्फ शफी उझ्मा असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

तर पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद युनुस साकी आणि इम्रान खान उर्फ युसुफ यांच्याकडील आतापर्यंत केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी पुण्यात दोनदा बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती नुकताच एनआयएने राजस्थान येथील गुन्ह्यात दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात दिल्यानंतर समोर आली होती. त्यातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण मुख्य आरोपी असलेल्या इम्रान खान याच्या पोल्ट्री फार्मवर मिळाल्याचाही खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.

संबंधित बातम्या :

एनआयएने राजस्थान येथील गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासात त्यानी इम्पुव्हाईज एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य राजस्थान येथील चित्तोरगड येथून जप्त करताना इसिसच्या सुफा या दशहतवादी संघटनेचा कट उधळून लावला होता. त्या गुन्ह्यात इम्रान खान आणि मोहम्मद साकी हे फरार होते. पुणे पोलिसांनी इसिसच्या दोन दहशतवाद्यांना पकडल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत असलेल्या तपासात आता धक्कादायक खुलासे होत आहे.

एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासात मोहम्मद साकी आणि इम्रान खान हे इसिसची विचारधारा पसरविण्यासाठी महाराष्ट्रात सक्रीय झाले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या अटकेमुळे देशातील इसिसची लिंक उघड करण्यास तपास यंत्रणांना यश आले आहे. साकी आणि इम्रान हे आयईडीज बनविण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय होते. त्याचबरोबर मास्टर माईंड असलेल्या इम्रान खान याच्याच पोल्ट्री फार्मवर इतर दहशतवाद्यांना आयईडी बनविण्याचे देखील प्रशिक्षण दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर इम्रान खानची पोल्ट्री एनआयने मागील महिन्यात जप्त केली आहे. राजस्थान येथून मुंबई आणि नंतर पुण्यात सेटल झाल्यानंतर त्यांनी पुण्यात बॉम्ब म्हणजे आयईडी बनविण्याचे दोन वर्कशॉप मागील वर्षात घेतल्याचे समोर आले आहे. फरार झाल्यापासून विविध तपास यंत्रणा शहानवाज याच्या मागावर होत्या. त्याने पुण्यातून धूम टोकून थेट दिल्ली गाठले असल्याचे आता समोर आले आहे. दहशतवादी कारवाई मध्ये सक्रिय असल्याने त्याच्या शोधा साठी एन आय ए ने तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलिसांची सतर्कता अन कट उघड
गस्तीवर असणार्‍या पोलिसांचे पथक त्यांच्या नजरेस पडेल त्याला बरोबर हेरतात. असाच काही एक प्रसंग दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान कोथरूड परिसरात दुचाकी चोरणार्‍या तिघांना पोलिसांनी हटकले. सुरूवातीला त्या तरूणांनी आयटीमध्ये आहोत असे सांगत हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बेरकी नजरने इतर प्रश्नांमध्ये त्यांना अडकवले. तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक कोंढवा परिसरातील त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी घुसले. अन इथेच बॉम्ब बनविण्याचा मोठा कट उघड झाला.

आतापर्यंत तपासात समोर आलेल्या बाबी

  • – दहशतवाद्यांच्या घरातून सापडले ड्रोनचे साहित्य, स्फोटकाच्या गोळ्या
  • – पुण्यात दहशतवाद्याचे प्रशिक्षण झाल्याचे आले समोर
  • – पुण्यातील विविध जंगलाची ड्रोनद्वारे पहाणी
  • – जंगलात वास्तव्य करून बॉम्बस्फोटाची चाचणी
  • – इसिसशी प्रसार करणार्‍या उच्चशिक्षीतांसह अनेक जणांना अटक
  • – इसिसच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरालाही अटक
  • – आर्थिक रसद पुरविणार्‍यांचा, भाडेतत्वावर जागा देणारेही अटकेत
  • – पुणे पोलिस नंतर महाराष्ट्र दशतवाद विरोधी पथक (एटीएस) सध्या एनआयएकडून तपास
  • – इसिसच्या पुणे मोड्युलशी संबंधीत पाच दहशतवाद्यांवर तीन लाखांचे बक्षीस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news