Crime News : गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला बेड्या

Crime News : गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला बेड्या

पिंपळनेर (साक्री) : पुढारी वृत्तसेवा, साक्री तालुक्यातील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी डीएनए तपासणीच्या आधारे जेरबंद केले असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. साक्री तालुक्यातील मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार दि. 3 मे रोजी उघडकीस आला होता. मुलगी गतिमंद असल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान होते. (Crime News)

पिंपळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तांत्रिक पद्धत अवलंबून पीडित मुलगी व परिसरातील तीन संशयित व्यक्तींचे रक्त नमुने डीएनएसाठी घेतले होते. त्यामध्ये संशयित शिवाजी डोंगर शिंदे (35, रा. अंबादर) हा संशयित आरोपी निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अटक करून त्याला साक्री न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस तपासात शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news