Sharad Pawar : समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो : शरद पवार

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : देशाच्या हितासाठी आणि गोरगरीब सर्वच समाज घटकांच्या उन्नतीसाठी झटणारी जी विचारधारा आहे, ती विचारधारा धरून चालण्याची आणि तिला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. तीच विचारधारा रुजविण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो. कितीही संकटे येऊ वारकरी संप्रदायाने समाज उन्नतीची भेदाभेद न पाळण्याची विचारधारा टिकवून ठेवली आहे हे विशेष, असे मत खासदार शरद पवार यांनी आळंदी येथे व्यक्त केले. भागवत वारकरी संमेलनाच्या उदघाटनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी त्यांनी आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिर सभामंडप दगडी बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प. दिनकर शास्त्री भूकेले संमेलन अध्यक्षपदी होते. खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, केशव महाराज उखळीकर, शामसुंदर सोन्नर, बापुसाहेब देहूकर, ज्ञानेश्वर जळगावकर, राजाभाऊ चोपदार व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा

भारतीयांच्या परदेशवारीची गगनभरारी

नसरापूर : अवघ्या चार तासातच ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट

Pune Crime News : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटांत राडा

 

Back to top button