नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो श्री. सदस्यांनी हातात झाडू घेऊन भल्या पहाटेच वेगवेगळ्या भागात स्वच्छता मोहिम सुरु केली आणी अवघ्या काही तासातच संपूर्ण नसरापूर स्वच्छ करून तब्बल ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली. चौकाचौकात आणि रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेला कचरा अवघ्या चार तासातच नसरापूर गाव चकाचक झाल्याने ग्रामस्थ भारावून गेले असून जिल्ह्यातील सर्वात मोठा महास्वच्छता अभियान ठरला आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नसरापूर ( ता. भोर) येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात जवळपास ६०० ते ६५० श्री सदस्यांनी सहभाग घेऊन तब्बल ३५ टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामध्ये सुका तर आणि ओल्या कचरा विघटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी सी.एन. वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, सर्कलाधिकारी प्रदीप जावळे, सरपंच सपना झोरे, उपसरपंच संदीप कदम, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, सदस्य गणेश दळवी, नामदेव चव्हाण, सुधीर वाल्हेकर, उषा कदम, मेघा लष्कर व ग्रामस्थ तसेच शंकरराव भेलके महाविद्यालय श्री. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा