Pune Crime News : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटांत राडा | पुढारी

Pune Crime News : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटांत राडा

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राजकीय वैमनस्यातून पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथे दोन राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये भावकीच्या वादातून तसेच राजकीय कारणावरून शुक्रवारी संध्याकाळी मोठा राडा झाला. या हाणामारीत सचिन दिलीप रावडे (वय 32, रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) याचा खून झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सासवड पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना या प्रकरणी अटक केली आहे, त्यामध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. विशाल गोकूळ रावडे यांनी फिर्याद दिली आहे.

सागर भानुदास रावडे, शशिकांत भानुदास रावडे, दत्तात्रय वामन रावडे, सुंदराबाई सखाराम रावडे, सारिका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. 29) दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादी विशाल गोकुळ रावडे हे मोटारसायकलवर एकटेच गावातील चौकातील गणपती मंडळासमोर गेले आणि तेथे शशिकांत रावडे व सोबतच्या लोकांना समजावून सांगत असताना शशिकांत रावडे, दिपक रावडे यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी विशाल रावडे सासवड पोलिस स्टेशन येथे गेले;

परंतु सायंकाळी त्यांचे नातेवाईक मयत झाल्याचे समजल्याने ते रावडेवाडीस परत आले. त्या वेळी गावातील चौकात सायंकाळी 6:40 सुमारास चौकात नवनाथ रावडे, अनिल रावडे, विजय रावडे, शुभम रावडे, अक्षय रावडे, सचिन रावडे, यश रावडे, वैभव रावडे, ओंकार रावडे हे त्यांची वाट पाहत उभे होते.

याच वेळी सागर भानुदास रावडे, शशिकांत भानुदास रावडे, दीपक सदाशिव रावडे, बाळासाहेब सदाशिव रावडे, अमर सखाराम रावडे, उमेश ज्ञानोबा रावडे, ज्ञानेश्वर वामनराव रावडे, सोमनाथ उर्फ बाबू हनुमंत रावडे, दत्तात्रय वामन रावडे, सुंदराबाई सखाराम रावडे, सारिका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे (सर्व रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) असे सर्वजण तेथे आले. त्यांच्यापैकी शशिकांत भानुदास रावडे याने तलवारीने व इतरांनी चाकू, काठ्या, लोखंडी रॉडने तसेच महिलांनी मिरची पूडचा वापर करून फिर्यादी आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांवर हल्ला केला.

या वेळी सारिका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे, सुंदराबाई सखाराम रावडे या महिलांनी मिरची पावडर फिर्यादींच्या डोळयात टाकली. त्या वेळी या प्रकरणात मृत्युमुखी पडलेला सचिन रावडे त्यांना आडवा आल्याने शशिकांतने त्यास ’तुला विशालचा लय पुळका आहे का? त्याला का वाचवतोस, तुलाच जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून शशिकांत रावडे याने तलवारीने सचिन रावडे याच्यावर वार केले व सागर भानुदास रावडे, दीपक सदाशिव रावडे, बाळासाहेब सदाशिव रावडे, ज्ञानेश्वर वामन रावडे, अमर सखाराम रावडे, सोमनाथ हनुमंत रावडे, दत्तात्रय वामन रावडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला ठार मारले.

याच वेळी तेथे उभ्या असलेल्या नवनाथ यांच्या इको गाडीची तोडफोड करून नुकसान केले आहे. सचिन रावडे, तानाजी रावडे, यश रावडे, ओंकार रावडे, वैभव रावडे हे जखमी झाल्याने त्यांना याच इको गाडीतून सासवड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी सचिन यास तपासून मयत घोषित केले. तानाजी निवृत्ती रावडे, ओंकार मस्कू रावडे, राजेंद्र रावडे, वैभव गजानन रावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सासवडचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव हे मोठ्या फौजफाट्यासह गावात पोहचले व त्यांनी शांतता निर्माण करत आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली. अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी गावात भेट देऊन स्थिती आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. यापूर्वी सासवड पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले व सध्या राजगडचे निरीक्षक असलेले आण्णासाहेब घोलप हे आपल्या फौजफाट्यासह तातडीने गावात पोहोचले.

त्यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, बाजीराव ढेकळे, उपनिरीक्षक श्रीराम पालवे, हवालदार रूपेश भगत, लियाकतअली मुजावर, गणेश पोटे, जब्बार सैय्यद, किसन कानतोडे, नीलेश जाधव, सुहास लाटणे, सूरज नांगरे, भगवान थोरवे, विक्रम भोर, रमेश कर्चे, प्रतीक धिवार, संजय दाने, वैभव मदने, हेमा भुजबळ, अश्विनी तावरे यांच्या पथकाने तातडीने गावात जाऊन शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच आरोपींना अटक केली.

हेही वाचा

Maratha Reservation : राजगुरूनगरला बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू

Pune Crime News : पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटांत राडा

जुन्नर : तुळजाभवानीच्या पलंगाचे तुळजापूरला प्रस्थान

Back to top button