Pune Crime news : वीस लाख रुपयांचे पाच कोटी करणे पडले महागात | पुढारी

Pune Crime news : वीस लाख रुपयांचे पाच कोटी करणे पडले महागात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदूसह साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तन्वीर श्यामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नारायण पेठेत राहायला आहे. महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची जमीन खरेदी व्यवहारातून आरोपी तनवीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. पुढे पाटीलने शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी पांडे यांची ओळख करून दिली. आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि फिर्यादी महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी 20 लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. टाकीतील 20 लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले. आरोपींशी महिलेने संपर्क साधला तेव्हा आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक बहुरे तपास करत आहेत.

हेही वाचा

रावणगाव : प्रदूषित पाण्यामुळे माशांची मरणयात्रा

Khadakwasla chain : खडकवासला साखळी प्रकल्पात जोरदार पाऊस

शिक्षण : रोगापेक्षा इलाज भयंकर

Back to top button