

हिंजवडी(पुणे) : हिंजवडी येथे बुधवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे (वय २३, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बुधवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चक्कर येऊ लागल्याने योगेश मेडिकलमध्ये गोळी घेण्यासाठी गेला असता तो जमिनीवर पडला. त्यास जवळील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.
हिंजवडी परिसरात योगेश अभिमन्यू साखरे यांना शिवाजी चौक येथे अचानक चक्कर आल्याने ते मेडिकल दुकानातून गोळी आणण्यासाठी गेले. योगेशला मागील सहा महिन्यापूर्वी बीपीचा त्रास होत होता. हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांनी त्याला हृदयाचा त्रास असल्याचे सांगितले. ज्या मेडिकल समोर उभा होता त्या ठिकाणी जवळपास कुठलाही डीजे वाजत नव्हता. मेडिकल जवळ असताना अचानक तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. रणजीत हॉस्पिटल येथे त्याला तात्काळ नेहले असता तेथील डॉक्टरांनी रुबी हॉस्पिटल हिंजवडी येथे तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्या ठिकाणी जाईपर्यंत योगेशने जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा