Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये देशभरात बँकांना पंधरा दिवस सुट्टी | पुढारी

Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये देशभरात बँकांना पंधरा दिवस सुट्टी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सणासुदीच्या काळात येत्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात विविध ठिकाणी १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर आपले बँकविषयक व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

२ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यानंतर नवरात्रौत्सव, दसरा यामुळे बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही १५ दिवस सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत, बँकेशी संबंधित कोणतेही कामे करताना अडचण येऊ नये म्हणून सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Back to top button