Latest
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाचे विसर्जन उद्याच करा
पुणे : अनंत चतुर्दशी गुरुवारी (दि.28) सायंकाळी सूर्यास्तालाच संपते आणि शुक्रवारी (दि.29) पितृपंधरवडा सुरू होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेचे श्राद्ध शुक्रवारीच आहेत. यामुळे गणेशोत्सवातील श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन गुरुवारी सूर्यास्तापर्यंतच करावे आणि धर्म पाळावा, असे आवाहन शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी गणेशभक्तांना केले आहे. सर्वांनी विसर्जन मिरवणुकीची वेळ पाळावी, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा

