‘एआय’ टिपणार आता जनुकीय बदल! | पुढारी

‘एआय’ टिपणार आता जनुकीय बदल!

वॉशिंग्टन : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून आता होणारे जनुकीय बदल देखील टिपले जाणार आहेत. जनुकीय बदल हेच आजाराचे मुख्य कारण असते. त्या अनुषंगाने हे बदल टिपणे अधिक उपयुक्त ठरणार आहे. गूगलची एआय फर्म डीप माईंडने हे तंत्र विकसित केले असून त्याला ‘अल्फामिंसेस’ असे नाव दिले गेले आहे.

होत असलेले जनुकीय बदल तब्येतीसाठी अनुकूल आहेत की प्रतिकूल, हे या अल्फामिंसेसमुळे जाणून घेणे शक्य होणार आहे. यामुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच उपचार सुरू करणेही देखील शक्य होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे तंत्र बरेच उपयुक्त ठरू शकेल, असा होरा आहे.

याबाबत अधिक अभ्यास करत असलेल्या संशोधकांनी आपल्या जीन्सची ओळख करण्यासाठी एआय टूल अल्फामिंसेसला प्रशिक्षण देण्यात आले आहे. गूगलचे हे तंत्र आतापर्यंत 90 टक्के निष्कर्ष अगदी बिनचूक देण्यात यशस्वी ठरल्याचा त्यांचा दावा आहे. संशोधकांनी 71 प्रकारच्या डीएनएमध्ये कसे बदल होतात, यावर या अभ्यासात भर दिला होता. संशोधक डॉ. जून चेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही जनुकीय बदल टिपणार्‍या काही चाचण्या अस्तित्वात आहेत, पण त्यांचे निष्कर्ष या प्रणालीइतके बिनचूक ठरलेले नाहीत. एडिनबर्ग विद्यापीठातील प्रा. जो मार्श यांनी जनुकीय बदल प्रोटिनच्या काम करण्याच्या पद्धतीला बाधक ठरू शकतात, असे निरीक्षण येथे मांडले.

Back to top button