Mumbai News : प्रसिद्ध हँगिंग गार्डन तब्बल सात वर्षांसाठी बंद होण्याची भीती | पुढारी

Mumbai News : प्रसिद्ध हँगिंग गार्डन तब्बल सात वर्षांसाठी बंद होण्याची भीती

मुंबई;पुढारी वृत्तसेवा :  ब्रिटीशकालीन जलाशयाचा पुनर्विकास प्रकल्प महानगरपालिकेने ठरल्याप्रमाणे रेटला तर मुंबईतील म्हातारीच्या बूटासाठी प्रसिद्ध असलेले मुंबईतील मलबार हिल येथील हैंगिंग गार्डन ७ वर्षांसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेने मलबार हिलवरील टेरेस गार्डन म्हणजेच फिरोजशहा मेहता उद्यान तथा हँगिंग गार्डनच्या खाली असलेल्या ब्रिटीशकालीन जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या जलाशयातून ग्रंट रोड, ताडदेव, गिरगाव, चंदनवाडी, मंत्रालय, चर्चगेट, सीएसएमटी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. १८८७मध्ये बांधलेल्या व सव्वा शतकाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या या
जलाशयाच्या पुनर्बाधणीचे काम पाच टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. या कामासाठी हॅगींग गार्डन बंद केले जाण्याची शक्यता आहे.
जलाशयाची दुरुस्ती आणि विस्तारासाठी गिग गार्डनमध्ये खोदकाम करण्यात येणार आहे. परंतु, पाणी साठवण्यासाठी जवळपास ९० दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधून पर्यायी मार्ग सापडत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

येत्या सात वर्षांच्या कालावधीत जलायश पाहून पुनर्बाधणी करण्याची योजना आहे, काम सुरू करण्याआधी लगतच्या भूखंडावरील सुमारे ३५० झाडे तोडणे आणि पुनर्रोपण करण्याव्यतिरिक्त संपूर्ण लँडस्केप क्षेत्र वेगळे करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सर्व परवानग्या मिळाल्या तर नोव्हेंबर २०२३ पर्यंत काम सुरू करण्यात येईल.

मुंबईच्या माथ्यावरील मलबार हिल परिसरातील हँगिंग गार्डन बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. मुंबईतील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून त्याला ९३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. मलबार हिलच्या ४ हजार चौरस फुटाच्या परिसरात हे गार्डन वसले असून त्यातील म्हातारीचा बूट हा लहान मुलांपाठोपाठ पर्यटकांचेही आकर्षण आहे. हँगिंग गार्डन मध्ये जवळपास संपूर्ण मुंबईचा नजारा दिसतो. या गार्डन मधे असलेली फुले, गवतापासून तयार केलेल्या प्राण्यांच्या कलाकृती, इको पाईट सर्व गोष्टीचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

Back to top button