Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना टळली! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आरती करताना लागली आग

Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना टळली! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आरती करताना लागली आग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आरतीसाठी दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी मित्र मंडळात आले असताना मंडळाने केलेल्या राम मंदिर देखाव्याच्या कळसाला अचानक आग लागली. त्याच वेळी जोराचा पाऊस सुरू झाल्याने आग दहा मिनिटांतच पूर्णपणे विझली. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

संबंधित बातम्या : 

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे अध्यक्ष असून, त्यांच्या विनंतीवरून नड्डा येथे आरतीसाठी आले होते. आरती सुरू असतानाच बाहेरच्या बाजूला ही घटना घडली. आरती संपली तेव्हा नड्डा यांच्या सुरक्षा रक्षकांनी आग लागल्यासंदर्भात त्यांना अवगत केले. नड्डा आणि घाटे बाहेर जाऊन आगीची घटना पाहत असतानाच पावसामुळे आग आटोक्यात आली. नड्डा यांनी मी येथे थांबू का? अशी विचारणा घाटे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना केली, तेव्हा 'तुम्ही पुढील कार्यक्रमाला जा' असे कार्यकर्त्यांनी त्यांना सुचविले.

घाटे यासंदर्भात म्हणाले, 'तेथे फॅन्सी फटाके उडविण्यात आले. त्या वेळी त्याची ठिणगी कळसावर पडून तेथे आग लागली. नड्डा आणि आम्ही आत आरतीच्या ठिकाणी होतो. पावसामुळे आग विझली. मात्र, अग्निशमन दलाच्याही चार गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी आग पूर्णपणे विझली का ? याची चाचपणी केली. दहा मिनिटे लागलेल्या आगीत कळसाचा काही भाग जळाला असून, देखाव्याचे दहा ते 15 टक्के नुकसान झाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news