Dr. SmitaDevi Jadhav : ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये डॉ. स्मितादेवी जाधव यांचा गौरव | पुढारी

Dr. SmitaDevi Jadhav : ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये डॉ. स्मितादेवी जाधव यांचा गौरव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रभर ‘पुढारी कस्तुरी क्लब’ची मुहूर्तमेढ रोवून महिलांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्याचे मोलाचे काम ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी केले आहे. आज या क्लबसोबत अनेक भागांतील महिला जोडल्या गेल्या असून, राज्यभरातील महिलांसाठी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी महिला संघटन आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 35 व्या पुणे फेस्टिव्हलचा ‘उत्कृष्ट महिला संघटन आणि महिला सक्षमीकरण गौरव’ पुरस्कार हा सन्मान मिळाला आहे.

डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी ‘कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 35 व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित केलेल्या महिला महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत काम करणार्‍या महिलांना ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या प्रसंगी डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांना ‘उत्कृष्ट महिला संघटन आणि महिला सक्षमीकरण गौरव’ पुरस्कार मिळाला आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’चे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अ‍ॅड. अभय छाजेड, पदाधिकारी कश्यपसिंह चुडासमा, बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते. महिला महोत्सवाचे उद्घाटन हेमा मालिनी यांच्या हस्ते झाले. करुणा पाटील यांनी प्रास्ताविक केले. नीरजा धीरेंद्र यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया ताम्हाणे यांनी आभार मानले.

‘कामातून वेगळी ऊर्जा मिळते’

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी नेहमी कामात व्यग्र असते. आपण कधी काम करणे सोडू नये. मी नेहमी चित्रपट, नृत्य आणि राजकारण या क्षेत्रात सातत्याने काम करीत आहे. कामातून मला वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळेच चित्रपट हे माझे करिअर, नृत्य माझी साधना, राजकारण ही सेवा आहे. महिलांसाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले असून, त्याचा महिलांनी आनंद साजरा केला पाहिजे. यामुळे महिलांना प्रोत्साहन आणि काम करण्याची ताकद मिळणार आहे. राष्ट्र उभारणीत महिला योगदान देऊ शकतील. प्रत्येक महिलेत एक उपजत कला असते. या कलेच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे जाऊ शकतात. आपण महिला म्हणून प्रत्येक क्षण सेलिब—ेट केला पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.’

हेही वाचा

सेकंडहँड मोबाईल घेताय? सावधान! आयएमईआय क्रमांक तपासा

TET News : टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या मालमत्ता जप्त!

Back to top button