TET News : टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी | पुढारी

TET News : टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 2022 ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार असून संकेतस्थळावर नोंदणीसाठी शिक्षण विभागाने दुसर्‍यांदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2018 आणि 2019 मध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रतिबंधित केले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ला प्रविष्ट होता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यामुळे या उमेदवारांना ‘पवित्र’ संकेतस्थळावरील शिक्षक भरती नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते. मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित उमेदवारांकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री समन्वयक अधिकार्‍यांनी केल्यानंतर स्वप्रमाणन करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

स्वप्रमाणपत्रासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या आदेशानुसार स्वप्रमाणनाची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र, गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या मालमत्ता जप्त!

कोविंद समिती जाणून घेणार सर्व पक्षांची मते

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी अमित शहा यांची खलबते

Back to top button