

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तेसवा :शहरातील 54 हजारांहून अधिक नागरिकांचे वाहन परवाने आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) प्रलंबित आहेत. तर 12 हजाराहून अधिक वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले असून, काही दिवसांत परवान्यांच्या कामाला
देखील सुरुवात होणार असल्याची माहिती हाती आली आहे. चार ते पाच महिन्यानंतर आता नागरिकांच्या हाती वाहनांची आवश्यक कागदपत्रे मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
स्मार्टकार्डच्या पुरवठ्याबाबत राज्याच्या परिहवन विभागाचा हैदराबाद येथील 'रोझ मार्टा' कंपनीशी असलेला करार संपुष्टात आला आहे. आता नव्याने कर्नाटक येथील एमटीसी कंपनीला स्मार्टकार्डचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार परिवहन विभागाला रोज 45 हजार स्मार्ट कार्ड मिळतील अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व कार्डच्या छपाईचे काम छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नागपूर या शहरात केले जात आहे.
प्रत्येक दिवसाला 45 हजार स्मार्ट कार्ड बनविली जातील, अशी माहिती नव्या कंपनीशी झालेल्या करारानंतर चर्चेत होती. मात्र हा वेग घेऊन, कधी कामे होतील, अशी ओरड शहरातील वाहन चालकांमधून होत आहे.
हेही वाचा