Pune Fort News : सिंहगड किल्ला पाहणीसाठी आता ‘सिग्नेचर वॉक’ | पुढारी

Pune Fort News : सिंहगड किल्ला पाहणीसाठी आता ‘सिग्नेचर वॉक’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या ‘हेरिटेज वॉक’ला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असल्याने आता सिंहगड किल्ला आणि आंबेगावमधील शिवसृष्टी पाहणी करण्यासाठी सिग्नेचर वॉक सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी स्वारगेट येथून वातानुकूलित मिनी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. हेरिटेज वॉक उपक्रमांतर्गत शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वास्तूंदरम्यानची बारा ऐतिहासिक ठिकाणे पायी फिरून दाखवली जातात.
पुढील टप्पा म्हणून महापालिकेने देश-विदेशातील पर्यटकांना सिंहगड किल्ला व आंबेगाव येथील शिवसृष्टी पाहता यावी, त्यांची माहिती मिळावी यासाठी ‘सिग्नेचर वॉक’ उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.सहभागी होण्यासाठी हशीळींरसशुरश्रज्ञ.िाल.र्सेीं.ळप ही लिंक आहे.
सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळाच्या दर्शनी भागामध्ये दुसर्‍या टप्प्यामध्ये लवकरच काम करण्यात येणार आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कामही करण्यात येणार आहे. किल्ल्यावर दिशादर्शक बोर्ड, नकाशा बसविण्यात येणार आहे.
– विकास ढाकणे, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 
हेही वाचा

Back to top button