नाशिक : नराधम बापाचा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

नाशिक : नराधम बापाचा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बलात्कार प्रकरणांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

उपनगरच्या कॅनॉल रोडवरील एका नगरामध्ये एक दाम्पत्य आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह राहते. मुलीची आई रात्रपाळीला ड्युटीवर गेल्यानंतर नराधम बापाने चिमुरडीवर वारंवार अत्याचार केला. दि. १२ ते २० सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. अत्याचारग्रस्त चिमुरडीस लघुशंका करण्यास त्रास होऊ लागल्याने तिने आईला सांगितल्यावर आईने मुलीला दवाखान्यात नेले होते. पण डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. आईने मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे नेले. घरी आल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने ही घटना सांगितली. आईने उपनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद देताच पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली. त्याला गुरुवारी (दि. 21) न्यायालयात हजर केले असता, दि. २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button