पुणे; पुढारी वृत्तसेवा : वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरात येणार्या गणेशभक्तांना मंडळांची, पार्किंगची, रस्त्यांची अचूक माहिती पुणे पोलिस वाहतूक शाखेतर्फे एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याला 'सारथी गणेश उत्सव गाईड 2023' असे नाव देण्यात आले असून, लिंकचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त विजयकुमार मगर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. ऐतिहासिक आणि परंपरागत उत्सवात अधिकाधिक नागरिकांना व पर्यटकांना सहभागी होता यावे, या उद्देशाने अॅपची निर्मिती केली आहे. या गाईडच्या माध्यमातून शहराचे मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळ, यांचा मार्ग पाहता येणार आहे.
वाहनतळ : एकूण 5 शाळा, 7 कॉलेज यांचे मैदान संध्याकाळी सहा ते पहाटे 4 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. तसेच, पार्किंगसाठी पुणे मनपाकडील, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्र इ. ठिकाणांची माहितीही लोकेशननुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा