HSC-SSC Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक कधी ? परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून विचारणा | पुढारी

HSC-SSC Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक कधी ? परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून विचारणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) गेल्या महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदविण्यासाठी दिलेला 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीही परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षांचे अंतिम वेळापत्रक तातडीने जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.

राज्य मंडळाने 28 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 21 फेब—ुवारी ते 23 मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा एक ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या माहितीसाठी हे वेळापत्रक ुुु. ारहरीीललेरीव. ळप या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करता येण्यासाठी तसेच परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.

या वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या 15 दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात सादर करण्याबाबत कळवले होते. ही मुदत साधारण आठवड्यापूर्वी संपली. त्यामुळे राज्य मंडळाने अंतिम किंवा संभाव्य वेळापत्रकात काही बदल असल्यास, त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या तयारीचे, तर पालकांना सुट्यांच्या दृष्टीने नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा

नाशिक : आंबोलीत जि. प. शाळेच्या विद्यार्थिनीचा प्रकृती खालावल्याने मृत्यू

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात आता सहाव्या दिवशीही डाॅल्बीचा ‘आव्वाज’; जिल्हा प्रशासनाकडून परवानगी

पुणे : ऑक्टोबरच्या 13 लाख टन कोट्यामुळे साखर नरमली

Back to top button