

पुणे : गणेशोत्सवानिमित्त राज्यातील नेत्यांचे पुणे दौरे चांगलेच वाढताना दिसून येत आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असल्याची माहिती आहे. आज 21 सप्टेंबरला ते पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देणार आहेत. त्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील देवेंद्र फडणवीसांसोबत पुण्यातील गणपती मंडळांना भेट देण्याची शक्यता आहे. बावनकुळेदेखील आज विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवानिमित्त शहरातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी देखील घेणार आहेत.
संबंधित बातम्या :
सायं. 5.40 वाजता : गणेश दर्शन, कसबा गणपती, कसबापेठ, पुणे
सायं. 6 वाजता : गणेश दर्शन, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.15 वाजता : गणेश दर्शन, तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.35 वाजता : गणेश दर्शन, गुरुजी तालिम मंडळ, लक्ष्मीरोड, पुणे
सायं. 6.55 वाजता : गणेश दर्शन, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 7.15 वाजता : गणेश दर्शन, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई, पुणे
सायं. 7.30 वाजता : गणेश दर्शन, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग, पुणे
सायं. 7.45 वाजता : गणेश दर्शन, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
रात्री 8.30 वाजता : गणेश दर्शन, साने गुरुजी मित्रमंडळ, अंबील ओढा, पुणे
रात्री 9 वाजता : गणेश दर्शन, साई गणेशोत्सव मित्र मंडळ, कोथरुड, पुणे
कालच २० सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन विविध गणपती मंडळांना भेटी दिल्या. सामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत आणि राज्यात चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी पक्षाचे शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा