नंदुरबार : घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारझोड करत लांबवले 25 तोळे सोने | पुढारी

नंदुरबार : घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारझोड करत लांबवले 25 तोळे सोने

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सिंधी कॉलनीत एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात पहाटेच्या सुमारास घुसत जबर मारझोड करत चोरट्यांनी 25 तोळे सोने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. शहरातील सिंधी कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त शिक्षक लेखराज नानकानी यांच्या घराच्या खिडक्या चोरट्यांनी पहाटे तोडल्या आणि घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील ऐवज काढला आणि दुसरे कपाट उघडण्यासाठी तोडफोड सुरू केली. बाजूच्या खोलीत झोपलेल्या नानकानी आवाज कसला येतो म्हणून ते खोलीत आले असता, चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांना जखमी केले. त्यांच्या पत्नीसही चोरट्यांनी मारहाण केली. चोरट्यांनी घरातील 25 तोळे सोने अन रोकड चोरून नेली. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. उपनगर ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button