Rohit Pawar : मोठे नेते मुद्दामहुन छोट्या नेत्यांना पुढे करतात : रोहित पवार | पुढारी

Rohit Pawar : मोठे नेते मुद्दामहुन छोट्या नेत्यांना पुढे करतात : रोहित पवार

पुणे : मला असं वाटतं की भाजपचे मोठे नेते मुद्दामहुन या छोट्या नेत्यांना पुढे करतात आणि म्हणतात की या नेत्यांच्या विरोधात बोला, त्या नेत्याच्या विरोधात बोला. पवार साहेबांबद्दल बोलले आम्ही समजू शकतो. पण तुम्ही अजित दादाबद्दल बोलता हे भाजपचे राजकारण आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

पुण्यातील फुलेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थींसोबत लक्षणिय आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात रोहित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष व पदाधिकारी उपस्थिती होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा जेव्हा त्यांचे सरकार नव्हते. तेव्हा तिथे जाऊन ते रस्त्यावर झोपले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन होते. तेव्हा त्यांनी तिथे जाऊन नाटक केलं. त्याबरोबरच धनगर आरक्षण विषयी जेव्हा त्यांचे सरकार नव्हते. त्यावेळेस त्यांचा घसा कोरडा पडेपर्यंत ते आंदोलनामध्ये बोलतात आणि जेव्हा त्यांची सत्ता येते तेव्हा ते शांत बसतात. असे म्हणत रोहित पवारांनी गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

हेही वाचा

वळसे पाटलांमुळे यांचे अस्तित्व : आ. मोहिते पाटील

Gauri Ganpati : गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन; जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्ताची वेळ

IND vs PAK in New York : न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाक क्रिकेट सामन्यचा थरार!

Back to top button