Gauri Ganpati : गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन; जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्ताची वेळ
पुढारी ऑनलाइन डेस्क : Gauri Ganpati : श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लाडक्या बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत आहे. हा आनंद द्विगुणित होणार आहे तो गौरींच्या आवाहनानंतर. गौरी गणपतीच्या आगमनाने वातावरण प्रसन्न राहून मनात चैतन्य निर्माण होते. जाणून घेऊ या पंचांगानुसार गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाचा मुहूर्त आणि ते कोणत्या नक्षत्रावर करायला हवे.
या नक्षत्रावर करा गौरी आवाहन – दाते पंचांग
दाते पंचांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. अनेकांकडे गौरीपुढे (Gauri Ganpati) नैवेद्य दाखवून तो दिवसभर ठेवून दुसर्या दिवशी खाण्याची प्रथा आहे, पण ताट तसेच ठेवून दुसर्या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.
- पंचांगानुसार 21 सप्टेंबर 2023, गुरुवारी गौरी आवाहन सूर्योदयापासून दुपारी 3:35 पर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे करावे.
- 22 सप्टेंबर 2023, शुक्रवार – गौरी पूजन करावे.
- 23 सप्टेंबर 2023, शनिवार – गौरी विसर्जन सूर्योदयापासून दुपारी 2:56 पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.
हे ही वाचा :