Pune Railway News : पुण्यातील ‘हे’ 3 रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; या मार्गाचा करा वापर

Pune Railway News : पुण्यातील ‘हे’ 3 रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; या मार्गाचा करा वापर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणाच्या कामामुळे पुण्यातील रेल्वे फाटके काही वेळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

ही तीन रेल्वे फाटके बंद…

  • पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद रेल्वे स्टेशन दरम्यानचे रेल्वेफाटक संख्या 34 रेल्वे ट्रॅकदुहेरीकरण संबंधित कामांमुळे शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 16 वाजेपर्यंत रस्ता बंद राहील.
  • पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद रेल्वे स्टेशन दरम्यानचे रेल्वेफाटक संख्या 33 ट्रॅक दुहेरीकरण संबंधित कामांमुळे शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते सोमवार दिनांक 18 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीसठी बंद राहील.
  • पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील वाल्हा-नीरा रेल्वे स्टेशन दरम्यानचे रेल्वेफाटक संख्या 27 दुरुस्ती संबंधित कामांमुळे शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते रविवार दिनांक 17 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news