पुणे
पुण्यात पाकिस्तानच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारत आपले जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे कॅम्प परिसरातील मराठा वार मेमोरियल, ईस्टट्रीट येथे पाकिस्तानच्या पुतळ्याला जोडे मारो अंदोलन करण्यात आले.
यावेळी शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा

