उत्कृष्ट मंडळ स्पर्धेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज; उद्याचा शेवटचा दिवस | पुढारी

उत्कृष्ट मंडळ स्पर्धेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज; उद्याचा शेवटचा दिवस

पुणे : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार असून, स्पर्धेत भाग घेण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातून 3 गणेश मंडळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 8 हजार 736 सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामीण हद्दीत 396 एक गाव एक गणपती मंडळे आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता येईल.

अशी आहेत बक्षिसे

शासन निर्णयातील अर्जाच्या नमुन्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav. plda@gmail. com या ई-मेलवर 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन सादर करणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

हेही वाचा

शिक्षक सोसायटीसमोर निदर्शने ; सभासदाच्या उपचारासाठी वेळेत कर्ज न दिल्याचा आरोप

पुण्यात प्लास्टिकबंदी फक्त नावालाच; प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

गणेश उत्‍सव २०२३ : आरती श्री गणपतीची (हिंदी)

Back to top button