गणेश उत्सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनाला आता फक्त 5 दिवस उरले आहेत. त्यासाठी घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. गणपतीच्या आरतीसह श्री गणपतीची (हिंदी) आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको॥
हाथ लिए गुडलद्दु साई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरी।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी॥
कोटी सूरजप्रकाश ऐबी छबी तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥2॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥
भावभगतसे कोई शरणागत आवे।
संतत संपत सबही भरपूर पावे॥
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥
हेही वाचा :