वाढती लोकसंख्या, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या, अशातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडणार्या राजकीय घडामोडी, त्यातून व्हीव्हीआयपी, राजकीय पुढार्यांचे वाढलेले पुण्यातील दौरे, पुढार्यांची विशेष सुरक्षा या सर्व बाबींवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सहपोलिस आयुक्तांना लक्ष ठेवावे लागते आहे. त्यामुळे शहराला आणखी एका सहपोलिस आयुक्तांची गरज असल्याचे दिसून येते. कायदा व सुव्यवस्थेसाठी एक, तर प्रशासन, क्राईम, ट्रॅफिकसाठी एक असे दोन सहपोलिस आयुक्त पुणे पोलिस आयुक्तालयाला भविष्यात मिळू शकतात. गृहविभागही त्यासाठी तयार आहे.