चंद्रपूर : वह्या पुस्तके देण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

चंद्रपूर : वह्या पुस्तके देण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलीला शाळेत वह्या पुस्तके देणार आहेत असा बहाणा करून आरोपीने स्वतःचे घरी नेवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. या घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. कैलास  झोडे ( वय 40) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील संशयित आरोपी कैलास झोडे याने, गावातील तीन अल्पवयीन मुलींना शाळेत मोठे साहेब येणार आहेत. ते वह्या पुस्तके देणार आहेत, असे सांगून शाळेत बोलावले. तेथे आरोपी हा एकटाच असल्याने दोन मुली तिथून परत आल्या. त्यानंतर आरोपी हा पिडीत मुलीला तिचे हात पकडुन तिला घरी घेवून नेऊन अत्याचार केले असे आरोप करण्यात आलेले आहेत.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द अपराध क्रमांक ४५५/२०२३ नुसार भांदवी कलम ३५४ (अ) , ३५४ (ड) , पॉक्सो कलम ८,१२ तसेच ॲट्रोसीटी ॲक्टचे कलम ३(१),(w) (I),(II) , ३(२)(v) , ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपी कैलाश झोडे याला अटक करण्यात आली आहे.

Back to top button