पुणे : मतदार यादीतील नावाची खात्री करा; जिल्हा  प्रशासनाचे आवाहन | पुढारी

पुणे : मतदार यादीतील नावाची खात्री करा; जिल्हा  प्रशासनाचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत केली जात आहे. तसेच मतदान केंद्रे सुसूत्रीकरण, नवमतदारांसह समाजातील वंचित घटकांची मतदार नोंदणी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील वर्षी 5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकरिता पुणेकरांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेकडून केले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत एकूण 79 लाख 51 हजार 420 मतदार आहेत. शहरात विधानसभेचे आठ, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, तर उर्वरित ग्रामीण भागात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून चालू वर्षी 5 जानेवारी 2023 ला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार आहेत.

असे शोधा नाव?

मतदार यादीत नाव हे  ुुु. र्पीीिं. ळप या संकेतस्थळावर किंवा  र्ीेींंशीी हशश्रश्रिळपश या मोबाइल अ‍ॅपवर संपूर्ण नाव, वय, लिंग, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.
शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी 17 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदार नोंदणी करणार्‍या नागरिकांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट करून पुढील वर्षी 5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे.
हेही वाचा

Back to top button