धुळे : दहिवेल येथे नूतन पोलिस चौकीचे भूमीपूजन | पुढारी

धुळे : दहिवेल येथे नूतन पोलिस चौकीचे भूमीपूजन

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील दहिवेल येथे नूतन पोलिस चौकीचे भूमीपूजन सोहळा उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या उपस्थितीत साक्रीचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या हस्ते पार पडला.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे दहिवेल येथील पोलिस चौकीची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक झाली. त्यामुळे दहिवेल येथील पोलिस चौकीचे स्थलांतर करणे आवश्यक झाले.

या पार्श्वभूमीवर साक्री पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या दहीवेल दूरक्षेत्राचे नूतन पोलिस चौकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या भूमीपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य खंडू कुवर, दहिवेल गावाचे सरपंच प्रकाश वळवी, उपसरपंच अमोल सोनवणे, वसंतराव बच्छाव, काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, श्रावण माळी, मनोज चौधरी, गणेश गावित, कन्हैयालाल माळी, डॉ. दिनेश मराठे, संदीप बच्छाव, मनोहर बच्छाव, तुषार माळी, अंकुश बच्छाव, पवन सदाशिव दहिवेल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्यासह दहिवेल आउट पोस्टचे उपनिरीक्षक राजू जाधव, दिनेश मावची, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button