Pune crime : पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कारवाई; अल्पवयीन मुलीसह ७ बांगलादेशी नागरिकांना पकडले | पुढारी

Pune crime : पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कारवाई; अल्पवयीन मुलीसह ७ बांगलादेशी नागरिकांना पकडले

पुणे : पुणे पोलिसांनी शहरातील बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणार्‍या सात बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. या कारवाईत पाच महिला आणि दोन नागरींकांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या अल्पवयीन मुलीला बांगलादेशातून पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणण्यात आले होते. शहरातील बुधवार पेठ परिसरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा एकदा ही मोठी कारवाई केली आहे.

पंधरा दिवसापूर्वी तब्बल १९ जणांवर कारवाई

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या तब्बल 19 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्यावस्तीत छापा टाकून 10 बांगलादेशी महिलांसह 19 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम 1950, तसेच परकीय नागरिक आदेश 1978 अन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

विधान परिषदेतील अजित पवार गटाचे ५ आमदार अपात्र ठरवा

पुणे : पीएमपी प्रशासनाची हिटलरशाही? चालक-वाहकांना महिन्याला एकच रजा

नाशिक : शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल बंदी, फक्त मुख्याध्यापकांचाच मोबाईल सुरू राहणार

Back to top button