Pune Maratha Andolan : दौंड तालुक्यात बंद पाळून निषेध; फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी | पुढारी

Pune Maratha Andolan : दौंड तालुक्यात बंद पाळून निषेध; फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

यवत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ मंगळवारी दौंड तालुक्यातील यवत वरवंड देलवडी खुटंबाव या गावांमध्ये बंद पाळून निषेध करण्यात आला आहे. यावेळी सर्वच गावांमध्ये निषेध सभा घेण्यात आल्या तसेच मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत अशा स्वरूपाच्या मागण्या देखील करण्यात आल्या, तर फडणवीस सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

यवत गावातील मुख्य चौकात निषेधार्थ सभा घेण्यात आली दौंड तालुक्यातील बहुतांश गावात गावांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंद पाळण्यात आला होता त्यामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या यवत आणि वरवंड गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. वैद्यकीय सेवा आणि महत्त्वाची दुकाने वगळता संपूर्ण बाजार पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान कसल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून यवत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील ठेवला होता.

हेही वाचा

Pune Police : पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकावर हल्ला; चौकीच्या दारातच विनयभंग

कोल्‍हापूर : शाहूवाडीतील करिअर अकॅडमीत १५ वर्षीय मुलावर अध्यक्षाकडून अनैसर्गिक कृत्‍य; गुन्हा दाखल

Rain Update : आजपासून राज्यातील बहुतांश भागांत तीन दिवस पाऊस

Back to top button