कोल्‍हापूर : शाहूवाडीतील करिअर अकॅडमीत १५ वर्षीय मुलावर अध्यक्षाकडून अनैसर्गिक कृत्‍य; गुन्हा दाखल | पुढारी

कोल्‍हापूर : शाहूवाडीतील करिअर अकॅडमीत १५ वर्षीय मुलावर अध्यक्षाकडून अनैसर्गिक कृत्‍य; गुन्हा दाखल

शाहूवाडी : पुढारी वृत्‍तसेवा शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील राजर्षी शाहू करिअर अकॅडमीच्या संचालकाने एका (१५ वर्षाच्या) विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय बळीराम लोकरे असे संशयित संचालकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत बाल लैगिक अत्याचार व अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला खोलीत झोपायला बोलवून पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने संशयिताने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. या शिवाय बाहेर घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अशी फिर्याद संबंधित पीडित अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी फिर्यादी मुलाकडे अधिक चौकशी केली. यामध्ये २६ ऑगस्टच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अत्याचाराचा प्रकार घडला असल्याचे समोर आले. शाहूवाडी पोलिसांना त्यांनी तपासाच्या विशेष सूचना दिल्या. यानुसार राजर्षी शाहू करीअर अकॅडमी करंजोशी शाहूवाडी पोलिसांनी तातडीने हालचाल करीत संशयित करिअर अकॅडमी संचालक संजय लोकरे याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली.

त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.५) दुपारी संशयित आरोपीला विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. फिर्यादी पीडित बालक (वय १५) हा चाकन (ता.खेड, जि.पुणे) येथील रहिवासी असून, सध्या रा.राजर्षी शाहू करीअर अॅकडमी, करंजोशी (ता. शाहूवाडी) येथे सौनिकी शिक्षण व पूर्वतयारीसाठी वास्तव्यास होता. त्याचे १० वी, व्यावसायिक शिक्षण झाले आहे. शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button