Rain Update : आजपासून राज्यातील बहुतांश भागांत तीन दिवस पाऊस | पुढारी

Rain Update : आजपासून राज्यातील बहुतांश भागांत तीन दिवस पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्याने राज्यात मान्सून पूर्णतः सक्रिय होत आहे. 5 ते 8 सप्टेंबर या तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भाला ऑरेंज, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला या उत्सवाला वरुणराजा हजेरी लावणार असल्याने गोविंदांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

राज्यात खूप दिवसांच्या खंडानंतर मान्सून पूर्वतः सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा गेल्या चार दिवसांपासून तयार होण्याची प्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण झाली. त्यामुळे संपूर्ण देशात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. राजस्थान, पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर हा भाग वगळता संपूर्ण देशाला 5 ते 8 सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यांत प्रामुख्याने पावसाचा जोर राहणार आहे.

महाराष्ट्रातही सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भाला 6 ते 8 हे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 5 ते 8 पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात 6 ते 8 ऑरेंज, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट..
ऑरेंज अलर्ट :
विदर्भ : 5 व 6 सप्टेंबर
————–
यलो अलर्ट :
कोकण : 6 व 7 सप्टेंबर ः
मध्य महाराष्ट्र : 5 ते 8 सप्टेंबर
मराठवाडा : 5 ते 8 सप्टेंबर ः
विदर्भ : 7 व 8 सप्टेंबर

हेही वाचा

पंकजा मुंडे यांची यात्रा त्र्यंबकेश्वराच्या दारी

Bypolls २०२३ : ६ राज्यातील ७ विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यामध्ये सुरु होते उपचार

Back to top button