पुणे : तक्रार देण्यास आलेल्या महिला पोलिस निरीक्षकावर, पोलिस चौकीच्या दारातच हल्ला करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मुंबई पोलिस दलातील फोर्स वनच्या कर्मचार्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नीलेश आंद्रेश भालेराव (रा. सांताक्रुझ, मुंबई) असे या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.