

पुणे; पुढरी वृत्तसेवा : पुणे शहरात आज हलक्या पावसाच्या सरी बसरल्या आहेत. आज शनिवारी पहाटेपासूनच पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे. महिनाभराच्या कालावधीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पहिला मिळालं. काल हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला होता.
बंगालच्या उपसगरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे शहरात आगामी 48 तास पावसाचा जोर राहील. शुक्रवारी रात्री पासूनच पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांची पहाट उजाडली ती पावसानेच, पहाटे सहाला सुरू झालेला पाऊस सकाळी 11.30 पर्यंत सुरूच होता.
पुणे शहरातील बिबवेवाडी, कोथरुड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर या भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पिंपरी चिंचवडमधील मोशी आणि मावळ तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद आहे.
हेही वाचा