ठाणे : आधी पत्नीवर गोळ्या झाडून संपवलं, नंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू | पुढारी

ठाणे : आधी पत्नीवर गोळ्या झाडून संपवलं, नंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश साळवी यांचे बंधू दिलीप साळवी (वय ५७) यांनी आपल्या पत्नीवर दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर पत्नीला मृत अवस्थेत पाहून दिलीप साळवी यांना देखील काही क्षणात हृइयाविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. ही घटना कळवा परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत दोघा पती- पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रमिला साळवी (वय ५१) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दिलीप साळवी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आपल्या पत्नीवर गोळीबार का केला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. कळवा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Back to top button