पुणे : तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ चित्रीकरण | पुढारी

पुणे : तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ चित्रीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  तरुणीवर बलात्कार केल्यानंतर व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर ब्लॅकमेल करीत वारंवार शरीरसंबंध ठेवले. तरुणीला मारहाण करीत चित्रीत केलेला व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवून दिला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कोंढवा रोड-कात्रज येथील एकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना 2019 ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान कात्रज, लोणावळा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीकडे शरीरसंबंधाची मागणी करून मारहाण करीत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याच्या धमकीने वारंवार शरीरसंबंध ठेवले. व्हिडीओ फिर्यादी तरुणीच्या मित्राला पाठवून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार
विमाननगरमधील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक सत्तुजी टिक्कल (रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पीडित तरुणीला टिक्कलने विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले होते.

त्या वेळी त्याने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तिला त्रास झाल्याने टिक्कल याने तिला जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले तसेच तिचे छायाचित्र घेत धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. पोलिस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.

हेही वाचा :

चीनमध्ये मिठासाठी मारामारी! जाणून घ्या कारण

पुणेकरांनो ! बेशिस्त अवजड वाहनचालकांची या ठिकाणी करा तक्रार

Back to top button