पुणेकरांनो ! बेशिस्त अवजड वाहनचालकांची या ठिकाणी करा तक्रार

पुणेकरांनो ! बेशिस्त अवजड वाहनचालकांची या ठिकाणी करा तक्रार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अवजड वाहनचालक नेहमी बेशिस्त व बेदरकारपणे धावतात. यामुळे अनेकदा अपघात झाले असून, त्यात अनेक दुचाकीस्वार आणि चारचाकीचालकांचा मृत्यू झालेला आहे. शहरात मुख्यत्वेकरून पीएमपी आणि ट्रकचालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. अशा चालकांना पुणेकरांनी रील्स व्हिडीआतून लक्ष्य केले आहे. पीएमपी, एसटी, ट्रक धावत असतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून, व्हिडीओमध्ये ठळक अक्षरात 'पुणेकर गाडी चालवताना मागे बस आणि शेजारी ट्रक यांनाच घाबरतात' असे म्हटले आहे.

पुणेकर कीर्ती म्हणते, आधीच्या बस आणि त्यावरील बेशिस्त चालकांमुळे मोठे अपघात व्हायचे. त्यात आता नव्या इलेक्ट्रिक बसची भर पडली आहे. या बसचा तर रस्त्यावर धावताना आवाजसुद्धा येत नाही. त्या बस अचानक कधी शेजारी, मागे यम म्हणून उभ्या राहतील, हे सांगता येत नाही. या प्रतिक्रियेला तेजस नांगरे याने दुजोरा दिला आहे. अंकिता म्हणते, बेशिस्तपणाचा कळस असणारे चालक म्हणजे संतोष माने आहेत. त्याला यश, सोनाली, अभिषेक यांनी दुजोरा दिला आहे. तर रिक्षाचालकसुध्दा मोठ्या प्रमाणावर बेशिस्त आहेत, असे कैवल्य म्हणतो.

पीएमपी चालकांची इथे करा तक्रार
ईमेल आयडी – complaints@pmpml.org
व्हॉटसअ‍ॅप नंबर – 9881495589
लँड लाइन नंबर – 020-24545454
सोशल मीडियावर – ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, ईमेल (फोटो, व्हिडीओसह :100 रुपये बक्षीस मिळणार)

अवजड वाहनचालकांबाबत येथे करा तक्रार…
चालकांच्या बेशिस्तपणासंदर्भात प्रवाशांनी थेट तक्रारी आरटीओच्या rto.12-mh©gov.in या ई मेल आयडीवर किंवा कार्यालयात अर्जाद्वारे कराव्यात, तर पीएमपी चालकांच्या ….असे आवाहन आरटीओने केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news