पुणे: कॅफेत गैरकृत्य करू देणाऱ्या मालकाला ठोठावली शिक्षा, जुन्नर न्यायालयाचा निर्णय

पुणे: कॅफेत गैरकृत्य करू देणाऱ्या मालकाला ठोठावली शिक्षा, जुन्नर न्यायालयाचा निर्णय

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: कॅफेमध्ये अवैधरित्या पार्टिशन करून गैरकृत्य करू देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये एक वर्षानंतर जुन्नर न्यायालयाने १० हजार रूपये दंड व ३ महिने सक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा दिली असल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मात्र जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी कॅफे चालवत असलेले मालक सतर्क झाले आहेत. विशाल संदिप पवार (रा. पाटे खैरेमळा नारायणगाव, ता. जुन्नर) असे जुन्नर न्यायालयाने शिक्षा ठोठवलेल्या कॅफे मालकाचे नाव आहे.

नारायणगाव परिसरात शाळा महाविद्यालयात जाणारे तरुण मुले- मुली कॉफी पिण्याच्या नावाखाली कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी गैरकृत्य करत असून यासाठी कॅफे मालकांनी विशिष्ट सोय केली आहे, अशा तक्रारी नारायणगावचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्याकडे आल्या होत्या. २२ ऑगस्ट २०२२ रोजी नारायणगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वारूळवाडी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराने वारुळवाडी कॉलेज रोड येथील मूनलाईट कॅफेमध्ये कॉलेजचे मुले व मुली असभ्य वर्तन करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने मूनलाइट कॅफेला भेट देऊन तपासणी केली. तेथे पार्टिशन करून गैरकृत्य चालत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार पोलिसांनी कॅफे मालक यांचेविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सुमारे एक वर्षाने म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ रोजी या खटल्याचा निकाल लागून जुन्नर न्यायालयाने कॅफे मालकास या गुन्ह्यामध्ये दोषी धरून शिक्षा ठोठावली. या घटनेचा तपास पोलिस हवालदार संतोष कोकणे यांनी केला होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news