Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचं ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत!

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. क्रेनने हार आणि जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड या एकेकाळच्या त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात येत आहेत. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा देखील आहे. त्यामुळे आता सत्तांतरानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अजित पवार काय बोलणार याकडे राज्यच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
निपाणीत बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग; ५ लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही
पिंपरी : अग्निशमन दलासाठी अद्ययावत 11 वाहनांसाठी 40 कोटींचा खर्च