पुणे : शहरातील अपघातांना आता लागणार ब्रेक | पुढारी

पुणे : शहरातील अपघातांना आता लागणार ब्रेक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आरटीओ प्रशासनाकडून शहरातील अपघात रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीनुसार असलेल्या मार्गांवर नुकतीच पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल सबंधित विभागांना दिला असून, लवकरच यावर उपाययोजना होणार आहेत. त्यामुळे शहरातील अपघातांना आता लवकरच ब्रेक लागणार आहे.

अपघात रोखण्यासाठी आरटीओच्या अधिकार्‍यांकडून शहरातील मार्गांची नुकतीच पाहणी करण्यात आली. त्या पाहणीनंतर या मार्गावरील आवश्यक त्या उपाययोजना आरटीओकडून सुचविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल तयार करण्यात आला असून, हा अहवाल सबंधित विभागांना म्हणजेच पीडब्लूडी, पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलिसांना उपाययोजना करण्यासाठी देण्यात आला आहे. लवकरच या विभागांकडून आरटीओने सुचवलेल्या अपघातप्रवण क्षेत्रांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील अपघातांना रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

सुचविलेल्या उपाययोजना…
वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स, ब्लिंकर्स बसविणे
पादचार्‍यांसाठी रस्ता क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करणे
दिशादर्शक फलक व ‘नो पार्किंग’ सूचनाफलक बसवणे
दुभाजकांची दुरुस्ती, अनावश्यक छेददुभाजक बंद करणे
गतिरोधक बसविणे, उच्च प्रकाशव्यवस्थेसाठी दिवे बसविणे
पदपथावरील, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे
आवश्यक तेथे ट्रॅफिक सिग्नल्स बसविणे

हेही वाचा :

डिप्रेशन जाणवतेय, मानसिक आजार ओळखायचा कसा?

अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळीबाबत कारवाया 177; गुन्हे दोनच!

Back to top button