पुणे : कर्जाच्या बहाण्याने घातला साडेआठ लाखांना गंडा | पुढारी

पुणे : कर्जाच्या बहाण्याने घातला साडेआठ लाखांना गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाला व्यक्तीला 8 लाख 45 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, कोथरुड पोलिसांनी तामाब्रता रॉय आणि सामाब्रता रॉय या दोघाच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीयुष राजुरकर (वय 29, रा. डीपी रोड, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रॉय यांनी फिर्यादी राजुरकर यांना हिंजेवाडी येथे बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टचा व्यवसाय करण्यासाठी चार कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. मात्र, त्या बदल्यात वेळोवेळी फिर्यादींकडून दोघांनी 8 लाख 45 हजार रुपये घेतले. दरम्यान त्यानंतर दोघांनी फिर्यादींना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवून दिले नाही किंवा त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

लालपरीचं चांगभलं ! पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ, तर प्रवासी पाचपट वाढले

पुणे : यल्ल्याच्या भावाची टीप अन् म्हस्केचा ‘गेम’!

अभिनेत्री सई लोकूर बेळगावात करणार पहिल्या बाळाचं स्वागत

Back to top button